Personal information

डॉ.नरेंद्र काळे यांच्या विषयी (व्यक्तीगत माहिती)

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक चळवळीची मानबिंदू आणि समर्पित सेवादार डॉ.नरेंद्र काळे यांचा प्रवास संघर्षमय राहिलेला आहे. मितभाषी, सौजन्यशील, उपक्रमशील आणि तरुणांची प्रेरणास्त्रोत डॉ.नरेंद्र काळे यांचे जनसंपर्काचे समृद्ध नेटवर्क अद्भुत आणि आझाट आहे.

 

खरंतर डॉ.नरेंद्र काळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना शब्दही अपुरे पडतील डॉ.नरेंद्र काळे यांचा जन्म 1980 रोजी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात झाला. वडील डॉ. हिरालाल काळे एम.बी.बी.एस. हे ढोकी या ठिकाणी सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. आई शोभा काळदाते या श्री.बनेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि गरीब बहुजन आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घर संसाराचा त्याग करणाऱ्या स्वर्गीय नारायणदादा काळदाते यांच्या धाकट्याकन्या होत्या. जेष्ठ समाजवादी नेते धर्मनिपेक्ष विचारांचे पुरस्कर्ते माजी खासदार डॉ.बापूसाहेब काळदाते हे नारायणदादाचे धाकटे बंधु त्यामुळे शोभाताईंच्या कुटुंबातही मानवतावादी, सेवाभावी, धर्मनिपेक्ष, वारकरी सांप्रदायाचे विचार भिणलेले होते. सुखी समाधानी कुटुंब पण नियतीला हे मान्य नव्हते. नरेंद्र अवघ्या तीन वर्षाचे असताना 1983 साली त्यांचे वडील डॉ. हिरालाल काळे यांचे अपघाती निधन झाले क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. काळे कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले नरेंद्र यांचा धाकटा भाऊ सुदीप हा तर त्यावेळी अवघ्या तीन महिन्याचा होता. अशा नाजूक परिस्थितीमध्ये शोभाताईंना माहेराकडील काळदाते परिवाराने मायेचा आधार दिला. शोभाताई आपल्या तीन चिमुकल्यांना उराशी घेऊन माहेरी केज तालुक्यातील इस्थळला आल्या. नरेंद्र काळे यांचे बालपण केज तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या सुंदर अशा इस्थळ गावात गेले. स्व.नाराणदादा काळदाते, खासदार डॉ.बापुसाहेब काळदाते, स्व.अंकुशराव काळदाते यांच्या सहवासात त्यांच्या विचारांचा फारमोठा प्रभाव नरेंद्रवर पडत राहीला.

स्वाभिमानी शोभाताईंनी घरी बसून राहण्यापेक्षा आपले पदवीनंतरचे शिक्षण पुढे सुरू केले. तीघा चिमुकल्यांना आजी स्व.सुभद्रा नारायणराव काळदाते यांच्या जवळ अंबाजोगाईला ठेवले. आणि स्वत: लातूर येथे राहुन शिक्षणशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर होळ येथील होळेश्वर विद्यालयत त्यांना शिक्षीकेची नौकरी मिळाली. निष्ठेने, सचोटीने आणि बांधीलकीने विद्यादानाचे काम करत आई शोभाताईंनी तीनही मुलांना शिकवले. नरेंद्र काळे यांचे बालवाडी ते दहावी पर्यंतचे शिक्षण सांस्कृतीक नगरी अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थे मध्ये झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामातील शुर विरांची पार्श्वभूमी असलेल्या योगेश्वरी शाळेमध्ये नरेंद्र काळे यांची व्यक्तिमत्व घडायला सुरूवात झाली. त्याच काळात आजोबा डॉ.बापुसाहेब काळदाते हे राजकीय क्षितिजावर चमकत होते. त्यांच्या विचारांचा आणि भाषणाचा प्रभाव शाळेतील सर्व समावेशक वातावरण आणि सुसंस्कृत कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे नरेंद्रला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अगदी शालेय वयातच सामाजिक कामात व चळवळीमध्ये नरेंद्र सहभागी होऊ लागला. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी लातूर येथील नामवंत राजर्षी शाहु महाविद्यालयात प्रवेश घेतलेला होता. लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांच्या घरी राहून त्यांनी अकरावी व बारावी पूर्ण केली. जाधव सरांच्या पत्नी या नरेंद्र काळे यांच्या मावशी असल्याने त्यांनी आईप्रमाणे नरेंद्रवर प्रेम केले.

बारावीचा निकाल लागला अवघ्या एका गुणाने नरेंद्रचा एम.बी.बी.एस प्रवेश हुकला. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची आर्थिक क्षमता नव्हती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय डेंटल कॉलेजला प्रवेश घेतला. पदवीच्या शिक्षणानंतर कौटुंबिक जबाबदारी मुळे लगेच अंबाजोगाई येथे त्यांनी दातांचा दवाखाना सुरू केला. स्व.डॉ.बापुसाहेब काळदाते यांच्या शुळाहस्ते या दवाखान्याचे उद्घाटन झाले. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई तसेच विविध सामाजिक संस्थांशी संलग्न राहून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले. त्याच दरम्यान शासकीय डेंटल कॉलेज मधील वर्ग मैत्रीण असलेल्या डॉ.हर्षा चव्हाण यांच्याशी 2005 मध्ये त्यांनी आंर्तजातीय प्रेम विवाह केला. डॉ.हर्षा या बंजारा समाजातील असल्या तरी कुटुंबात एकरूप झाल्या. डॉ.हर्षा यांच्या समर्थ पाठबळामुळेच आज डॉ.नरेंद्र काळे पुर्णवेळ समाजकारण व राजकारणात आत्मविश्वासाने वावरत आहे. सांस्कृतीक व शैक्षणिक नगरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातील वास्तव्याने नरेंद्र काळे यांच्यावर सुसंस्कृत पणाचे संस्कार झाले. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक सुसंस्कृत व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून डॉ.नरेंद्र काळे यांची ओळख निर्माण होण्यात अंबाजोगाई शहराने महत्वाची भुमीका बजावलेली आहे. आज ते माननीय शरद पवार साहेबांच्या सोबत ठामपणे आणि आत्मविश्वासाने उभे राहिले आहेत.