Political

  • राष्ट्रवादी पक्ष संघटनेतील कार्य.
  • प्रदेश उपाध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पक्ष शरदचंद्रजी पवार) (23-08-2022 ते आज पर्यंत)
  • प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस (पक्ष शरदचंद्रजी पवार) पदवीधर संघटना (21-02-2023 ते आज पर्यंत)
  • प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉक्टर्स सेल महारष्ट्र राज्य (11-07-2013 ते 23-08-2022)
  • प्रदेश सरचिटणीस : राष्ट्रवादी युवक काँग्रेस (2012 ते 2013)
  • जिल्हाध्यक्ष : डॉक्टर्स सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड (2004 ते 2012)
  • जिल्हा उपाध्यक्ष : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, औरंगाबाद (2001 ते 2002)
  • समन्वयक : हल्लाबोल आंदोलन 2017
  • सदस्य : नगर परिषद, अंबाजोगाई, जि. बीड. (०५-०६-२०१० ते डिसेंबर २०११ आणि ०२-०१-२०१२ ते डिसेंबर २०१७)
  • जाहिरनामा समिती सदस्य : लोकसभा व विधानसभा निवडणुक जाहिरनामा 2019 समिती

निवडणुकीतील पक्ष कार्य

पक्ष स्थापनेपासुन आजपर्यंत पक्षाच्या सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवीले आहे.

  1. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला व परळी तालुक्याची जबाबदरी पारपाडली.
  2. 2024 विद्यानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात विविध ठिकाणी बैठकी घेऊन पक्षाचा प्रचार केला.
  3. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 15 मतदारसंघात 46 ठिकाणी डॉक्टरांची मिटींग घेऊन पक्षाचा प्रचार केला.
  4. 2019 विद्यानसभा निवडणुकीत ‘केज मतदारसंघाची प्रचार यंत्रणा राबविली.
  5. राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचा प्रदेशाध्यक्ष या नावाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवित असलेल्या 21 पैकी 19 मतदार संघात विविध ठिकाणी डॉक्टरांच्या मिटींग घेऊन प्रचार केला.
  6. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे पक्षाने सत्तेत असताना घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला.
  7. 2017 च्या केज विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनिय कार्य.
  8. विद्यार्थी दशेपासुन मराठवाडा विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघात मतदार नोंदणी ते प्रत्यक्ष प्रचार व निवडणुक यंत्राणा राबविण्या पर्यंत कार्य केले.
  9. 2002 पासुन आज पर्यंत स्थानिक पात्ळीवरील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकी साठी सहभाग घेतला.

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल च्या माध्यमातुन केलेले आरोग्य विषयी विशेष कार्य

  1. कोविड-19 मध्ये डॉक्टर्स सेल च्या माध्यमातुन Doctor’s for Maharashtra, Corona Help Line, Face Shield Distribution, डॉक्टर्स आपल्या दारी, मानसिक आरोग्य हेल्पलाईन, Covid Testing Help, कै.आर.आर.आबा.पाटील यांचा जन्म दिवशी कोविड रूग्णांची सेवा, Doctors Online Meeting & निवेदने, डॉक्टरांच्या संरक्षणा संदर्भात, मिडीयावर सरकारची बाजु मांडली, संघटनात्मक बांधणी, सकस आहार (Dray Fruits Distribution for Covid Patients), मुख्यमंत्री निधीसाठी मदत, Online Quiz, कोविड टेस्टींग लॅबच्या उभारणीत मदत अशा विविध उपक्रमे राबवण्यात आली.
  2. सांगली, कोल्हापुर, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी 250 डॉक्टरांच्या मदतीने 125 पेक्षा जास्त ठिकाणी वैद्यकीय तपासणी व उपचार शिबीरे घेऊन सुमारे 50,000 पेक्षा जास्त रूग्णांना वैद्यकीय मदत दिली.
  3. 2016 च्या मराठवाड्यातील दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बीड उस्मानाबाद व लातुर जिल्ह्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातुन समुपदेशन कार्य.
  4. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय आरोग्य शिबीरांचे आयोजन.
  5. 2017 मध्ये ‘अवयव दान जनजागृती व अवयव दाता नोंदणी’अभियान
  6. मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेंबांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त महिला आरोग्य सप्ताहा अंतर्गत राज्यभर महिलांच्या आरोग्याची शिबीरे.
  7. 2015 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदती.
  8. 2014 मध्ये मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर तंबाखु व मुखकर्करोग विरोधी जनजागृती अभियान.
  9. 2013 मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता जनजागरण अभियान.
  • खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी डॉक्टरांच्या वतीने विशेष प्रयत्न.
  • पक्षाच्या विविध नेत्यांच्या वाढदिवसाला किंवा गरजेप्रमाणे वैद्यकीय शिबीरांचे आयोजन.
  • पदवी घरपोच अभियानाद्वारे हजारो पदवीधरांना घरपोच पदवी प्रमाणपत्र.

 

खालील आंदोलनात व प्रश्न सोडविण्यात सक्रीय सहभाग

  1. महाराष्ट्रात डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा करण्यासाठी केलेले आंदोलन व पाठपुरावा.
  2. Homeopathy डॉक्टरांना Allopathy ची Practice करण्यासाठी विशेष कायदा करण्यासाठीच्या आंदोलनातील सक्रिय सहभाग व पाठपुरावा.
  3. मराठवाडा विभागालील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी केलेला पाठपुरावा.
  4. बोगस डॉक्टरांवरील कार्यवाही साठी पाठपुरावा.
  5. Clinical Establishment Act. च्या विरोधातील आंदोलनात सहभाग.
  6. Radiologist Association च्या वतीने आयोजित आंदोलनात सक्रिय सहभाग.
  7. Paramedical क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवली.