पू.नारायणदादा काळदाते उच्च शिक्षण सहाय्यता निधी:-
समाजातील आर्थिक दृष्टया कमकुवत असणाऱ्या व विशेषत: ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी, बुध्दिमत्तेच्या जोरावर परीक्षेत सरस ठरतात परंतु त्यापैकी प्रत्येकाला उच्चशिक्षण पुर्ण करता येत नाही. शैक्षणिक शुल्काची भरपाई सरकार करीत असेल तरी भोजन, निवास व ईतर साहित्य यासाठी लागणारा पैसा सरकार देत नाही. ही अडचण लक्षात घेऊन केवळ आर्थिक कारणंमुळे ज्या गरीब पंरतु गुणवान विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणात अडचण येऊ शकते त्यांना हातभार लावणे ही या योजनेमागची मुख्य भूमिका आहे.
- गुणवंत परंतु आर्थिक दुरावस्थेमुळे उच्चशिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या निधी अंतर्गत मदत केली जाते.
- ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासुन ते अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रतिवर्षी दिली जाते.
- ही मदत रिव्हॉलव्हींग म्हणजेच बिनव्याजी परतफेड स्वरुपाची असुन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर हे पैसे प्रतिष्ठानला परत करवे लागतील. ज्यामुळे ह्या योजनेचा फायदा पुढे अनेकांना मिळत राहील.
- पन्नास हजार रुपये किंवा अधिकच्या देणगीतुन एका विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणासाठी मदत दिली जाते. जी व्यक्ती अथवा संस्था रु50,000/- किंवा अधिक देणगी देईल, त्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे नाव या सहाय्यता उपक्रमाला जोडले जाते. म्हणजेच त्या व्यक्तीने अथवा संस्थेने एका विद्यार्थ्याचे संपुर्ण शिक्षण पूर्ण केले, असे म्हणता येईल त्यासाठी उर्वरीत रक्कम संस्थेच्या एकत्रित फंडातुन दिली जाते.
- रु.50,000/- एक रकमी अथवा रु.10,000/- पुढील पाच वर्ष ही देता येतात.
अशी देणगी देणारा प्रत्येक व्यक्ती या संस्थेचा आजिव सभासद होतो. किंवा
- आजिव सभासद फी रु. 500/-
आपल्याला शक्य असलेली कुठलीही छोट्यात छोटीही मदत प्रतिष्ठान
या निधी अंतर्गत आत्तापर्यंत प्रतिष्ठान मार्फत एकुण 71 विद्यार्थ्यांना रु. 44,10,000/-
एवढी मदत करण्यात आली आहे.
| अभ्यासक्रम | विद्यार्थी | रक्कम |
| वैद्यकीय | 34 | 26,85,000/- |
| अभियांत्रिकी | 26 | 11,50,000/- |
| चार्टड अकाऊटंट | 2 | 80,000/- |
| एम. बी. ए. | 2 | 80,000/- |
| बी. फार्मसी | 2 | 1,20,000/- |
| बायोटेक्नॉलॉजी | 1 | 80,000/- |
| इतर | 4 | 2,15,000/- |
| एकुण | 71 | 44,10,000/- |
यापैकी 56 मुलांचे शिक्षण पुर्ण झाले आहे. शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्याकडुन
संस्थेस रु.21,13,000/- रक्कम परत फेड स्वरुपात प्राप्त झाले आहेत.
कार्यकारी मंडळ
| अक्र | नाव | पत्ता | पद | व्यवसाय |
| 1 | श्री.गोपीकिशन गुलाबचंद रांदड | टिचर्स कॉलनी, अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड | अध्यक्ष | चार्टर्ड अकाऊटंट |
| 2 | श्रीपती किशनराव जोगदंड | नागसेन नगर अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड | उपाध्यक्ष | सेव निवृत्त प्राध्यापक |
| 3 | डॉ.नरेंद्र हिरालाल काळे | ओम शांती कॉलनी, अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड |
सचिव | वैद्यकीय व्यवसाय |
| 4 | डॉ.नवनाथ बळीराम घुगे | हौसिंग सोसायटी अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड |
सहसचिव | वैद्यकीय व्यवसाय |
| 5 | श्री.विश्वास मदनराव नरवडे | आनंद नगर, अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड |
कोषाध्यक्ष | व्यापार |
| 6 | श्री.प्रताप पुंडलीकराव पवार | यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई | सदस्य | उद्योजक |
| 7 | श्री.अनिकेत व्दारकादास लोहिया | विद्याकुंज कॉलनी अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड |
सदस्य | शेती |
| 8 | श्री.अंगद शिवदास तट | प्रशांत नगर, अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड |
सदस्य | सेवानिवृत्त |
| 9 | श्री.जयसिंग आनंदराव चव्हाण | शिवनेरी हौसिंग सोसायटी अंबाजोगाई जि.बीड | सदस्य | वकील |
| 10 | रजनी अंकुशराव काळदाते | अमृत नगर यशवंतराव चव्हाण चौक,अंबाजोगाई | सदस्य | सेवानिवृत्त |
| 11 | श्री.ज.सय्यद बाबामिया | महेक प्रशात नगर, अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड |
सदस्य | शेती |
दुष्काळग्रस्त गरीब विद्यार्थ्यांना मदत
2019 च्या दुष्काळात विद्यापीठाने डॉ.नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षते खाली दुष्काळग्रस्त विद्यार्थी मदतीसाठी समिती गठीत केली व विद्यापीठातील दुष्काळग्रस्त गरीब विद्यार्थ्यांना भोजनासाठी सुमारे 40 लाख रू. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातुन जमा केले. 822 (472 मुले व 350 मुली) 9 लाख 4 हजार 200 रू इतकी एका महिन्याची मदत देण्यात आली.
































