Movements

आझाद मैदान, मुंबई

अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना राज्य शासनाने १० ऑक्टोबर २०२४ च्या रोजीच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान जाहीर केले. मात्र अजूनही सदर अर्थिक तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज आमच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत आंदोलनस्थळी भेट देऊन शासनाचा निषेध केला. तसेच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष या शिक्षकांच्या मागण्या मंजूर करून देण्यासाठी विधीमंडळाच्या सभागृहात सुद्धा आग्रही मागणी करेल, हे आश्वासन दिले.

विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व विद्यापीठातील कर्मचारी आंदोलन करत आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद च्या परीसरात आंदोलनात सहभागी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन : राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंबाजोगाई येथे आंदोलन

महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन याने जनता त्रस्त झाली असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंबाजोगाई येथे आंदोलन करण्यात आले. स्वा. सावरकर चौकापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी गाड्या कार्यकर्त्यांनी हाताने ढकलत नेल्या.

या आंदोलनात माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी डाँक्टर सेलचे प्रमुख डॉ. Narendra Kale, मा. राजपाल लोमटे, तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे, मा. गोविंद देशमुख, रणजीत मोरे, गोविंद टेकाळे यांसह अनेक कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

आंदोलने

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने रूग्णांसाठी व जनतेसाठी सामाजिक जाणिवेतुन आरोग्य शिबीरे, डॉक्टरांच्या विविध प्रश्नास राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल सातत्याने निवेदने, आंदोलने करत मागणी करत आली आहे. डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा, होमिओपॅथी डॉक्टरांचा ॲलोपॅथीची प्रॅक्टीसची परवानगी असो की, कोविड काळात बॉम्बे नर्सिंग रजिस्टेशन ला मुदतवाढ मिळणे असो. असे विविध महत्वाचे प्रश्न राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल सातत्याने हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.

बीड जिल्ह्यात वाढलेली स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न

तंबाखू च्या आजारात संदर्भात व मुखकर्क रोग जनजागृती अभियान