Nationalist Doctor Cell
A
राष्ट्रवादी डॉक्टर सेल ही महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाने स्थापन केलेली पहिली डॉक्टरांची संघटना आहे. देशाचे नेते आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80% समाजकारणाचाच एक भाग म्हणुन डॉक्टर सेल चा जन्म झाला. डॉ.दिलिप घुले यांच्या हाती डॉक्टर्स सेलची धुरा दिली डॉ.दिलिप घुले यांच्या 10 वर्षाच्या कालखंडा नंतर खा.सुप्रियाताई सुळे, ना.अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नरेंद्र काळे यांनी यांची संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी 2013 साली डॉ.नरेंद्र काळे यांची निवड झाली.
निवड होताच संघटनेच्या बांधनी सोबतच वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक उपक्रम संघटनेने राबविणे सुरू केले.
B
- शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची व स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी राज्यातील अनेक शाळांमध्ये आरोग्य विषयक व्याख्याने राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
- उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी गुटखाबंदीचा निर्णय महाराष्ट्रात घेतला त्या निर्णयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी व मुख कर्करोगाविषयक जनजागृतीसाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल च्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तंबाखुच्या आजाराविषयी माहिती देणारे पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
- खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘महिला आरोग्य सप्ताहाचे’ आयोजन करून 75 ठिकाणी महिलांची तपासणी, रोगनिदान व उपचार शिबीरे आयोजित करण्यात आली. या माध्यमातुन बारा हजार चव्वेचाळीस महिलांची तपासणी व औषधोपचार करण्यात आहे.
- 2017 मध्ये ‘अवयवदान जनजागृती व अवयव दाता नोंदणी’ अभियान घेऊन अवयव दानाच्या चळवळीत राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने सहभाग घेतला.
- 1 जुलै डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांचा आरोग्य सेवा गौरव करणे राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने सुरू केले.
- 2019 मध्ये प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेबांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असलेल्या विधान सभा मतदार संघामध्ये सर्वरोग निदान शिबीरे आयोजित करण्यात आली. त्याचा निश्चितच फायदा मतदारसंघातील नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या संपर्कात जाण्यासाठी झाला. चांगली यशस्वी शिबीरे आयोजित झालेल्या मतदारसंघात नक्कीच यश चांगले मिळाले आहे.
C
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसाला विविध आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येतातच परंतु राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमातुन काही महत्वाचे कार्यक्रम देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले आहेत.
त्यामध्ये
- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन.
2016 च्या बीड, लातुर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या भिषण दुष्काळात शेतकरी आत्महत्या वाढत असताना देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी या मानसिक दृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या डॉक्टरांना मानसिक समुपदेशनाचे कार्य करण्याचा आदेश दिला.
डॉ.नरेंद्र काळे, डॉ.राजेसाहेब चव्हाण, डॉ.सुनिल गरड व सहकाऱ्यांनी बीड, उस्मानाबाद व लातुर जिल्ह्यात विविध ठिकाणी मानसिक समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना मानसिक बळ वाढविण्याचे अवघड व महत्वपुर्ण काम केले.
एवढेच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यी, कार्यकर्ते, आशा वर्कर्स यांना ही समुपदेशनाचे प्रशिक्षण देऊन या कार्यक्रमात सहभागी केले.
- पुर:- 2019 सालच्या सांगली, सातारा, कोल्हापुर च्या पुर परिस्थितीत श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब, ना.अजितदादा पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नरेंद्र काळे, डॉ.सुनिल जगताप, डॉ.शिवदीप उंदरे, डॉ.पृथ्वीराज पाटील, डॉ.अतुल मोरे यांच्या सह सुमारे 175 डॉक्टरांनी या पुरग्रस्त भागात 125 पेक्षा जास्त ठिकाणी वैद्यकीय शिबीरे घेऊन 60,000 पेक्षा जास्त पुरग्रस्त रूग्णांना मदत केली.
- पश्चिम महाराष्ट्र प्रमाणेच गेल्या वर्षी कोकणातील पुरामध्ये ही राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने सुमारे 200 डॉक्टरांच्या सहाय्याने 150 पेक्षा जास्त ठिकाणी रूग्णसेवा दिली. अगदी ज्या ठिकाणी रस्ते वाहुन गेले आहेत अशा ठिकाणी ही डोक्यावरून औषधी वाहुन नेऊन औषधोपचार करण्यात आले आहेत.
- या सर्व पुर परिस्थिती मध्ये व नेहमी गरज भासेल तेव्हा औषधींची सढळ हाताने मदत करण्याचा माजी आमदार श्री.जगन्नाथअप्पा शिंदे यांचे संघटना आभार व्यक्त करते.
D
कोविड
भारतात मार्च 2020 मध्ये पहिला कोविड रूग्ण सापडला अगदी त्या दिवसापासुन राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे डॉक्टर्स महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरले.
सुरवातीच्या काळात PPE व N-95 Mask ची कमतरता असल्यामुळे डॉक्टरांच्या मनात ही भिती होती. पण राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे पदाधिकारी पहिल्या दिवसापासुन स्वत:चा दवाखान्यातुन सेवा देत होते.
- राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमातुन प्रत्येक जिल्ह्यात रूग्णांच्या मदतीसाठी Helpline सुरू करण्यात आल्या.
- राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातुन आदरणीय पवार साहेबांनी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना व डॉक्टरांना फेसशिल्ड चे वाटप केले.
- डॉ.सुनील जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवुन रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल चे अनेक डॉक्टरांनी कोविड टेस्टींग तथा कोविड वार्डात सेवा देऊन शासनास मदत केली.
- लॉकडाऊन मुळे मानसिक ताण तणावाचे व मानसिक रोगाचे प्रमाण वाढलेले असताना मानसिक समुपदेशनासाठी ही राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने हेल्पलाईन सुरू केली.
- कोविड च्या दुसऱ्या लाटेत तर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल च्या डॉक्टरांची स्वत:ची 57 हॉस्पीटलस् कोविड रूग्णालये म्हणुन कार्यरत होती. काही ठिकाणी समाजसेवी संस्थांच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
- कोविड लसीकरण जनजागृती शंका आणि निरसन व लसीकरणाची शिबीरे आयोजित करण्यात आली.
- रूग्णांना बेड मिळवुन देणे, रेमडेसिव्हीर किंवा औषधे मिळवुन देणे, इ. बाबी मध्ये आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे साहेब व पक्षाच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावुन राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल लढत होते.
E
आंदोलने
राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने रूग्णांसाठी व जनतेसाठी सामाजिक जाणिवेतुन आरोग्य शिबीरे, डॉक्टरांच्या विविध प्रश्नास राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल सातत्याने निवेदने, आंदोलने करत मागणी करत आली आहे.
डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा, होमिओपॅथी डॉक्टरांचा ॲलोपॅथीची प्रॅक्टीसची परवानगी असो की, कोविड काळात बॉम्बे नर्सिंग रजिस्टेशन ला मुदतवाढ मिळणे असो. असे विविध महत्वाचे प्रश्न राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल सातत्याने हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.
F
संघटन
मा.प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची नव्याने बांधनी करत जुन्या अनुभवी पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरावर काम करण्याची जबाबदारी देऊन तुलनेचे नवीन व तरून डॉक्टरांना जिल्हा व तालुकास्तरावर नियुक्ती देण्यात येणार आहेत.
संघटनेच्या बैठकातुन संघटनेची बांधनी सुरू आहे.
G
निवडणुका
2013 साली डॉ.नरेंद्र काळे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतल्यावर त्यानंतर 2014, 2019 या लोकसभा, विधानसभ निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी डॉक्टरांच्या बैठका घेऊन त्यांना पक्षाच्या बाजुने उभा करण्याचे कार्य राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने केले. फक्त लोकसभा, विधानसभा बरोबरच राज्यातील पदवीधर व शिक्षक निवडणुक मध्ये राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने उल्लेखनीय कार्य केले आहे.
डॉ.काळेज् डेंटल क्लिनीक, अंबाजोगाई
डॉ. नरेंद्र काळे यांनी २००२ साली 'काळे दातांचा दवाखाना' या नावाने आपल्या वैद्यकीय सेवेचा प्रवास सुरू केला.
गेल्या २३ वर्षांपासून हा दवाखाना अंबाजोगाई, बीड येथील जनतेसाठी एक विश्वासार्ह आरोग्य केंद्र बनला आहे. या काळात, दवाखान्याने हजारो रुग्णांना दंत उपचारांच्या विविध सेवा पुरवल्या आहेत.
सुरुवातीच्या काळात, दवाखान्यात सामान्य तपासणी आणि उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले. परंतु, जसजशी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली, तसतसे डॉ.नरेंद्र काळे यांनी आपल्या दवाखान्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणे आणली. यामुळे रुग्णांना रुग्ण सेवा चांगल्या प्रकारे आणि कमी वेळेत देणे शक्य झाले.
येथे केवळ किडलेल्या दातांवर उपचारच नाही, तर रूट कॅनाल, दात काढणे, कृत्रिम दात बसवणे (डेंचर्स आणि इम्प्लांट्स), आणि ऑर्थोडोंटिक उपचार (दात सरळ करण्यासाठी) यांसारख्या विशेष सेवाही दिल्या जातात. दवाखान्यात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला विशेष महत्त्व दिले जाते, जेणेकरून रुग्णांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये.
या २३ वर्षांच्या प्रवासात, डॉ.नरेंद्र काळे आणि त्यांच्या टीमने स्थानिक समुदायात एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या रुग्णसेवेची गुणवत्ता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन आणि व्यावसायिकता यामुळे हा दवाखाना परिसरातील रुग्णांसाठी एक पसंतीचा पर्याय बनला आहे.