Education

श्री.बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा, ता.केज जि.बीड या संस्थेची स्थापना 1958 साली स्व.नारायणदादा काळदाते यांनी व सहकाऱ्यांनी केली

'संस्थेअंतर्गत ०४ माध्यमिक शाळा, (1)महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा, (2)श्री.होळेश्वर विद्यालय होळ, (3)गुरूदेव विद्यालय मोरेवाडी, (4)साने गुरूजी विद्यालय भावठाणा व ०१ कनिष्ठ महाविद्यालय श्री.होळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय होळ आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ०३ अनुसुचित जातीचे विद्यार्थ्यांसाठी (1)शेड्युल्ड कास्ट होस्टेल बनसारोळा, (2)साने गुरूजी वसतिगृह होळ, (3)मागासवर्गीय वसतिगृह भावठाणा असे वसतिगृहे आहेत. संस्थेतून आतापर्यंत एक लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ही शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण आणि विकासाच्या संधी देऊन ग्रामीण भागातील समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विकासाच्या संधी देण्यासाठी समर्पित आहे.

     या संस्थेचा सचिव म्हणुन दि. 27 डिसेंबर 2020 तारखेला डॉ.नरेंद्र काळे यांनी जबाबदारी स्वीकारली व आजतागायत या जबाबदारीवर कार्यरत आहेत.

क्षितीज प्रतिष्ठान, अंबाजोगाई, जि.बीड च्या संस्थापक सचिव डॉ.नरेंद्र काळे आहेत.

ही एक अराजकीय सामाजिक संस्था/ट्रस्ट असून, ती सोसायटी ॲक्ट १८६० आणि १९५० अंतर्गत नोंदणीकृत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश शिक्षण आणि इतर सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजाचा विकास करणे आहे.

सध्या, ही संस्था कै.आ.वसंतराव काळे पब्लिक स्कुल, प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळा यशस्वीपणे चालवत आहे, जिथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.

याव्यतिरिक्त, संस्था शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त इतरही अनेक सामाजिक, सांस्कृतीक, उपक्रमांमध्ये सक्रिय आहे,

या संस्थे अंतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गगत “राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण योजना” ही क्षितीज प्रतिष्ठान, संचलित कै.आमदार वसंतराव काळे पब्लिक स्कुल, वाघाळा, ता.अंबाजागाई जि.बीड ही निवासी शाळा चालवली जाते.

Educational –

1. Life Member Marathwada Shikshan Prasarak Mandal Chatrapati Sambhajinagar (MSP)

2. Member of IMC Government Industrial Training Institute, Ambajogai.

3. Member of Loknete Gopinathrao Munde Rural Development Organization, Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University, Chh.Sambhaji Nagar (Project by Gov. of Maharashtra)

4. Member of Vidyalay Management Committee Jawahar Navoday Vidyalay (JNV) Gadhi, Georai Dist.Beed