पू.नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान, अंबाजोगाई
पू.नारायणदादा काळदाते यांनी बनसारोळा ता.केज जि.बीड या ठिकाणी राहुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट केले. 7 सप्टेंबर 2008 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी हृदयरोगाने नारायणदादा काळदाते यांची प्राणज्योत मालवली.
पू.नारायणदादांच्या मृत्यूनंतर परिसरातील डॉ.द्वारकादासजी लोहिया, श्री.जी.जी.रांदड, श्री.एस.के.जोगदंड, श्री.बी.बी.ठोंबरे, स्व.अंकुशराव काळदाते, श्री.मदनराव नरवडे, अमर हमीब व डॉ.नरेंद्र काळे यांनी मिळुन स्व.नारायणदादा काळदाते यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी इसवी सन 2009 मध्ये ‘पूज्य नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान’ (अंबाजोगाई जि. बीड) ची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दादांच्या स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला ‘पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार’ दिला जातो.
तसेच आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते. पू.नारायणदादांच्या पश्चात त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन हे प्रतिष्ठान गरीब व होतकरू मुलांना शिक्षणासाठी सहाय्य करत आहे.
पू. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या वतीने मराठवाड्याच्या सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका व्यक्तीस / संस्थेस पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.21,000/- चा धनादेश, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, शॉल व पुष्पगुच्छ असे असते.
पू.नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराचे मानकरी
| सन | पुरस्कारचे मानकरी | शुभहस्ते |
| 7 सप्टेंबर 2009 | प्राचार्य प्रतापराव बोराडे सर | श्री. यु. म. पठाण |
| 7 सप्टेंबर 2010 | श्री.गोपाळराव पाटील | श्री.गंगाप्रसादजी अग्रवाल |
| 7 सप्टेंबर 2011 | श्री. सिद्रामप्पा नागाप्पा आलुरे गुरुजी | कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे |
| 7 सप्टेंबर 2012 | श्री.मोहनराव सोळुंके | श्री.भाई वैद्य |
| 7 सप्टेंबर 2013 | डॉ.नागनाथ कोतापल्ले | डॉ.श्री.सदानंद मोरे |
| 7 सप्टेंबर 2014 | श्री. द. रा. कुलकर्णी | कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे |
| 7 सप्टेंबर 2015 | डॉ.श्री. बी. आय. खडकभावी | कुलगुरु श्री.देवानंद शिंदे |
| 7 सप्टेंबर 2016 | मा.श्री. संदीप पवार | मा.डॉ. एन. व्ही. कल्याणकर |
| 7 सप्टेंबर 2017 | महत्मा ज्योतीबा फुले वसतिगृह, अंबाजोगाई डॉ. सुरेश खुरसाळे | मा.श्री.लक्ष्मीरमणजी लाहोटी |
| 7 सप्टेंबर 2018 | मा.श्री. प्रविणकुमार श्रीराम काळमपाटील | मा.डॉ.श्री. ए.एस. ढवन |
| 7 सप्टेंबर 2019 | राष्ट्रसेवा दल संचलित आपल घर | ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर |
| 7 सप्टेंबर 2021 | प्राचार्य डॉ.भागवत जनार्धन कटारे | डॉ.प्रमोद येवले कुलगुरु डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद |
| 7 सप्टेंबर 2023 | मा. श्री. राजेश टोपे | मा. खा. सुप्रियाताई सुळे लोकसभा सदस्य |
| 9 सप्टेंबर 2024 | मा.डॉ.तसनिम पटेल | प्रा.अंजलीताई आंबेडकर सामाजिक कार्यकर्त्या |
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई. ही महाराष्ट्रात कार्यरत असलेली एक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आहे. डॉ.नरेंद्र काळे हे या संस्थेच्या अंबाजोगाई केंद्राचे (बीड जिल्ह्यासाठी) सचिव म्हणून कार्यरत आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या नामवंत संस्थेच्या बीड जिल्हा केंद्राचे सचिव म्हणून डॉ.नरेंद्र काळे हे दिनांक 01/04/2016 पासुन कार्यरत आहेत. या सेंटरच्या वतीने तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागविण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 'युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली' चे आयोजन करण्यात येते.
खा.शरदपवार साहेबांच्या सुचनेवरून व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या माध्यमातुन लातुर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या दुष्काळग्रस्त भागात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक समुपदेशन करण्यासाठी डॉ.नरेंद्र काळे यांनी पुढाकार घेतला. या भागातील गावा गावात जावुन पारंपारिक किर्तनाच्या मदतीने, मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाने या शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केले. दुष्काळग्रस्त रूग्णांसाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अन्नछत्र सुरू केले. दुष्काळी भागात आरोग्य तपासणी शिबीरे घेतली.
या सेंटरच्या माध्यमातून अनेकानेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. अंबाजोगाई परीसराच्या पर्यटन विकासासाठी ही डॉ. नरेंद्र काळे यांनी प्रयत्न केले.
त्याचबरोबर या सेंटरच्या माध्यमातुन शिवजयंती निमित्त विशेष कार्यक्रम, यशवंतराव चव्हाण जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, कृषी विषयक एक दिवसीय कार्यक्रम, करीयर मेळावा, स्वातंत्र्य ज्योत रॅली, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, दिवाळी पहाट पाडवा, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, बापुसाहेब काळदाते स्मृती वक्तृत्व स्पर्धा, बालकुमार साहित्य संमेलन/अपंग साहित्य संमेलन इत्यादी उपक्रमेही राबवली जातात.
मराठवाडा जनता विकास परिषद
डॉ.नरेंद्र काळे हे मराठवाडा जनता विकास परिषद, शाखा अंबाजोगाई चे 2019 पासुन अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
मराठवाडा जनता विकास परिषद ही मराठवाड्यातील विकासाच्या प्रश्नांवर काम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेची स्थापना मराठवाड्याच्या विकासातील अनुशेष दूर करण्याच्या उद्देशाने झाली आहे.
मुख्य उद्दिष्ट्ये आणि कार्य:
- विकासाचा पाठपुरावा: मराठवाड्याच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रांतील अनुशेष दूर करण्यासाठी ही परिषद शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करते. यामध्ये सिंचन, शिक्षण, उद्योग, रेल्वे, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
- आंदोलने आणि बैठका: आपल्या मागण्यांसाठी ही परिषद अनेकदा शांततापूर्ण मार्गाने आंदोलने आणि बैठका आयोजित करते. स्थानिक पातळीवर तसेच केंद्रीय पातळीवर नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते.
- जनजागृती: मराठवाड्यातील जनतेला विकासाच्या प्रश्नांबद्दल जागरूक करणे, त्यांचे हक्क आणि मागण्या मांडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हे परिषदेचे एक महत्त्वाचे कार्य आहे.
- स्थानिक प्रश्नांवर लक्ष: अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देणे, मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करणे अशा स्थानिक प्रश्नांवरही ही परिषद आवाज उठवते.
- वैधानिक विकास मंडळांचा आग्रह: मराठवाडा विकास मंडळांसारख्या वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्स्थापनेसाठी आणि त्यांना मुदतवाढ देण्यासाठी परिषदेने सातत्याने प्रयत्न केले आहेत.
- पाणी प्रश्न: मराठवाड्यातील पाणीटंचाई हा एक मोठा प्रश्न आहे. परिषदेने या प्रश्नावर सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत, ज्यात जायकवाडी धरणात पाणी सोडणे, समन्यायी पाणी वाटप धोरणाची अंमलबजावणी करणे, आदींचा समावेश आहे.
थोडक्यात, मराठवाडा जनता विकास परिषद ही एक अराजकीय संघटना असून, ती मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.